Anuradha Vipat
त्वचेची काळजी घेताना केवळ उत्पादने वापरणे पुरेसे नसते तर ती योग्य पद्धतीने आणि क्रमाने वापरणे महत्त्वाचे असते.
सर्वात आधी तुमची त्वचा तेलकट , कोरडी , मिश्र की संवेदनशील आहे हे ओळखा.
त्वचेच्या प्रकारानुसारच फेस वॉश, मॉइश्चरायझर आणि इतर उत्पादने निवडा
हिवाळा असो वा पावसाळा, किंवा तुम्ही घरात असाल तरीही सनस्क्रीन लावणे अत्यंत आवश्यक आहे.
दिवसातून फक्त दोनदाच फेस वॉश वापरा. जास्त वेळा चेहरा धुण्याने त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते.
कोणत्याही नवीन उत्पादनाचा वापर करण्यापूर्वी 'पॅच टेस्ट' करा.
दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्या, जेणेकरून त्वचा हायड्रेटेड राहील.