Anuradha Vipat
जर तुम्ही सलग एक आठवडा रात्री झोपताना चेहऱ्यावर ग्लिसरीन लावले तर तुम्हाला तुमच्या त्वचेत आश्चर्यकारक बदल दिसून येतील.
ग्लिसरीन हे उत्तम 'ह्युमेक्टंट' आहे, जे हवेतील ओलावा शोषून त्वचेत टिकवून ठेवते.
ग्लिसरीनमुळे कोरडी त्वचा पहिल्या दोन-तीन दिवसांतच मऊ होऊ लागते.
ग्लिसरीन नियमित वापराने त्वचेचा निस्तेजपणा दूर होतो आणि चेहऱ्यावर एक नैसर्गिक तजेला येतो.
त्वचा हायड्रेटेड राहिल्यामुळे चेहऱ्यावरील बारीक रेषा कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे तुम्ही अधिक तरुण दिसता.
ग्लिसरीन त्वचेच्या पेशींच्या नूतनीकरणास मदत करते ज्यामुळे मुरुमांचे डाग किंवा काळे डाग हळूहळू कमी होतात.
ग्लिसरीन त्वचेवर एक संरक्षक थर तयार करते जो प्रदूषण आणि धुळीपासून त्वचेचा बचाव करतो.