Roshan Talape
पावसाळ्यात सर्दी, ताप आणि संसर्ग होण्याची शक्यता वाढते, म्हणून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ खाणे गरजेचे आहे.
आल्यात जंतुनाशक आणि सूज कमी करणारे घटक असतात. ते काढा, चहा किंवा अन्नात वापरल्यास इम्युनिटी वाढते.
लिंबू, आवळा आणि संत्री यामध्ये भरपूर व्हिटॅमिन C असते, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
तुळशी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते आणि सर्दी-खोकल्यावर गुणकारी असते. तिचा काढा किंवा चहा पिणे फायदेशीर ठरते.
लसूण नैसर्गिक अँटीबायोटिक आहे. दररोज एक-दोन पाकळ्या खाल्ल्यास संसर्ग टाळता येतो.
हळदेत जंतूनाशक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. कोमट दूधात हळद घालून प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
हिंग, मिरे आणि दालचिनी हे मसाले पचन सुधारतात, शरीर गरम ठेवतात आणि आजारांपासून संरक्षण करतात.
पावसाळ्यात या नैसर्गिक पदार्थांचा आहारात समावेश केल्याने आजारमुक्त राहता येईल.