Mahesh Gaikwad
भूतान हा निसर्गरम्य देश असून हिमालयाच्या कुशीत वसलेला आहे. निसर्गरम्य प्रदेश, प्राचीन परंपरा आणि मठांमुळे याच्या सौंदर्यात अजूनच भर घालतात.
हिरव्या गवताळ पठारांनी वेढलेली ही दरी, काळ्या मानेच्या क्रेन्स पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे ठिकाण निसर्गप्रेमींना भुरळ घालते.
पुनाखा झॉन्ग हा भूतानमधील सर्वात सुंदर आणि ऐतिहासिक किल्ला आहे. हा भूतानच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला भव्य किल्ला आहे.
हिरवाईने नटलेली ही दरी ट्रेकिंग प्रेमींसाठी एक अप्रतिम ठिकाण आहे. गर्दीपासून दूर शांतता हवी असल्यास या ठिकाणाला नक्की भेट द्या.
३०८ प्रार्थना स्तूपांनी सजलेला डोलचुला पास, निसर्गप्रेमींसाठी एक अनोखा खजिना आहे.
थिंपू ही भूतानची राजधानी असून आधुनिक जीवनशैली आणि प्राचीन परंपरेचं सुंदर संगम आहे. बुद्धा प्वॉईंट, रंगीबेरंगी स्थानिक बाजारपेठ आणि राष्ट्रीय स्मृती स्तूप हे इथले मुख्य आकर्षण आहेत.
टायगर नेक्स मठ हे भूतानमधील सर्वात प्रसिध्द आणि लोकप्रिय ठिकाण आहे. हा मठ उंच डोंगरावर असून ध्यानधारणेसाठी प्रसिध्द आहे.
पारो हे भूतानचं सांस्कृतिक केंद्र मानलं जातं. इथे पारो म्युझियम, जुन्या गल्ल्या, आणि स्थानिक हस्तकलेच्या दुकानांमधून भटकंती हा वेगळाच अनुभव देवून जातो.