Anuradha Vipat
लहान मुलांना सतत सर्दी होणे हे सामान्य असले तरी त्रासदायक असते.
कोमट दुधात हळद आणि चिमूटभर काळी मिरी पावडर मिसळून मुलांना रात्री झोपताना द्या. यामुळे कफ बाहेर पडतो आणि आराम मिळतो.
हळद आणि थोडे पाणी एकत्र करून पेस्ट बनवा आणि बाळाच्या छातीवर व तळपायाला लावा. यामुळे सर्दीचा जोर कमी होतो
सर्दी झाल्यास वाफ घेणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे . यामुळे बंद नाक लगेच मोकळे होते.
मधात थोडा आल्याचा रस मिसळून मुलांना द्या. यामुळे घसादुखी आणि खोकल्यापासून आराम मिळतो.
तुळशीची पाने, आले आणि काही काळी मिरी पाण्यात उकळून काढा बनवा. हा काढा मुलांना दिल्यास सर्दी आणि खोकल्यामध्ये खूप आराम मिळतो
मोहरीच्या तेलात लसणाच्या २-३ पाकळ्या आणि ओवा टाकून हे तेल कोमट झाल्यावर बाळाच्या छातीवर, पाठीवर आणि तळपायाला मालिश करा.