Anuradha Vipat
मासे खाणे हे आरोग्यासाठी अत्यंत वरदान मानले जाते कारण त्यामध्ये शरीराला आवश्यक असणारी अनेक पोषक तत्त्वे असतात.
मासे हे ओमेगा-३ चा सर्वोत्तम स्रोत आहेत. हे घटक मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात.
शरीरातील स्नायूंच्या मजबुतीसाठी आणि पेशींच्या दुरुस्तीसाठी माशांमधून उत्तम प्रथिने मिळतात.
मासे हे व्हिटॅमिन-डी चा उत्तम नैसर्गिक स्रोत आहेत जे हाडांच्या मजबुतीसाठी आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी आवश्यक आहे
माशांमध्ये आयोडीन, सेलेनियम, झिंक आणि पोटॅशियम यांसारखी महत्त्वाची खनिजे मुबलक प्रमाणात असतात
नियमित मासे खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.
ओमेगा-३ मुळे वाढत्या वयानुसार कमी होणारी दृष्टी किंवा डोळ्यांच्या समस्या रोखण्यास मदत होते