Anuradha Vipat
सतत होणारे पित्त ही आजकालच्या धावपळीच्या जीवनातील एक मोठी समस्या आहे.
चुकीचा आहार आणि अवेळी जेवण यामुळे छातीत जळजळ, मळमळ आणि डोकेदुखी यांसारखे त्रास होतात.
पित्त झाल्यावर अर्धा ग्लास थंड दूध प्यायल्याने पोटात होणारी जळजळ लगेच थांबते.
जेवणानंतर अर्धा चमचा बडीशेप चावून खाल्ल्याने पचन क्रिया सुधारते आणि गॅस किंवा पित्ताचा त्रास होत नाही.
पिकलेले केळे हे नैसर्गिक 'अँटासिड' आहे. त्यात पोटॅशियम भरपूर असते, जे पोटातील ॲसिडची पातळी नियंत्रित ठेवते.
एक ग्लास पाण्यात जिरे उकळून ते पाणी कोमट झाल्यावर प्या. यामुळे पचनसंस्था शांत होते.
आल्याचा एक छोटा तुकडा चावून खा किंवा आल्याचा चहा प्या. आल्यामध्ये दाहशामक गुणधर्म असतात.