Anuradha Vipat
पाणी कमी पिण्याचा थेट परिणाम तुमच्या दातांच्या आणि तोंडाच्या आरोग्यावर होतो.
शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास लाळ तयार होण्याचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे अनेक समस्या उद्भवतात.
लाळ तोंडातून बॅक्टेरिया आणि अन्नाचे कण वाहून नेण्याचे काम करते. पाणी कमी पिल्याने तोंड कोरडे पडते, ज्यामुळे बॅक्टेरियांची वाढ वेगाने होते
लाळेचे प्रमाण कमी झाल्यामुळे मृत पेशी आणि बॅक्टेरिया जिभेवर आणि हिरड्यांवर साचतात, ज्याचे रूपांतर दुर्गंधीत होते
लाळेमध्ये असे काही खनिज असतात जे दातांच्या कव्हरचे रक्षण करतात. पाणी कमी पिल्याने दात लवकर किडण्याची शक्यता वाढते.
लाळेच्या अभावामुळे हिरड्यांना संसर्ग होऊ शकतो, ज्यामुळे हिरड्यांमधून रक्त येणे किंवा सूज येणे अशा समस्या जाणवतात
शरीरातील उष्णता वाढल्यामुळे आणि तोंड कोरडे राहिल्याने जिभेवर किंवा गालाच्या आतल्या बाजूला फोड येऊ शकतात