Aslam Abdul Shanedivan
घर असो वा आफिस किंवा आणखीन काही ते उठावदार दिसण्यासाठी रंग दिला जातो. मग यासाठी पेंट वापरला जातो
पण आता शेणापासून नैसर्गिक पेंट तयार करण्यात आला असून बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा अँटीफंगल आहे
केमिकल-आधारित पेंटपेक्षा शेणापासून नैसर्गिक पेंट सुरक्षित असून ते घराला थंड ठेवण्याचे काम करते
शेणापासून बनवलेले नैसर्गिक पेंट देखील बिनविषारी आणि गंधहीन असतात.
शेणापासून बनवलेले हे पेंट नॅचरल प्रिंट या ब्रँड नावाने विकले जात असून ते सुरक्षित आणि र्यावरणपूरक आहेत
नॅशनल लाईव्हलीहुड मिशन अंतर्गत उन्नावच्या नवाबगंजमध्ये गोबर पेंट प्लांटची स्थापना करण्यात आली आहे.
तर यातून महिला बचत गटांना वेगळी ओळखच मिळाली असून महिलांना रोजगारही मिळाला आहे