Aslam Abdul Shanedivan
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून अनेक जन सतत फ्रीजचे गार पाणी पितात
पण थंड पाणी पिल्याने तहान भागतेच असे नाही, उलट हे गार पाणी आरोग्यासाठी घातक ठरू शकते
तर शेतात काम करून आल्यानंतर अति थंड पाणी पिणे टाळावे असे आरोग्यतज्ज्ञांचे म्हणणे आहे
उन्हाळ्यात शरीर थंड ठेण्यासाठी पाणी फार गरजेचे असते. अशा वेळी अति थंड पाणी जास्त पिले जात नाही. यामुळे शरिरात पाण्याची कमतरता होऊ शकते
थंड पाण्याच्या अति सेवनाने शरीरातील इतर अवयवांचे नुकसान होऊ शकते. यामुळे श्वसनाचा त्रास होऊ शकतो
अति थंड पाणी पाणी पिल्याने डोकेदुखी वाढून मायग्रेनची समस्या वाढू शकते
उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाणी पिल्यामुळे पचनक्रियेत समस्या निर्माण होऊन लठ्ठपणा वाढू शकतो