Anuradha Vipat
'नो-मेकअप मेकअप लूक' म्हणजे कमीत कमी मेकअप वापरून चेहऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य खुलवणे.
कॉलेज, ऑफिस किंवा रोजच्या धावपळीत अवघ्या ५ मिनिटांत हा फ्रेश लूक मिळवण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा.
नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी मेकअपपूर्वी त्वचा स्वच्छ करून मॉइश्चरायझर लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
त्वचेचा रंग एकसमान दिसण्यासाठी BB क्रीम, CC क्रीम किंवा टिंटेड मॉइश्चरायझर बोटांच्या मदतीने चेहऱ्यावर हलकेच पसरवून लावा.
नॅचरल ग्लोसाठी पावडर ब्लशऐवजी लिप अँड चीक टिंट किंवा क्रीम ब्लश वापरा.
भुवया कोम्ब करून आयब्रो जेलने सेट करा. डोळे मोठे आणि सुंदर दिसण्यासाठी पापण्यांवर मस्कराचा फक्त एक हलका कोट लावा.
मेकअप जास्त वेळ टिकण्यासाठी आणि चेहरा तेलकट दिसू नये म्हणून हलकी लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर टी-झोनवर टॅप करा.