Anuradha Vipat
नऊवारी साडी नेसणे ही केवळ एक परंपरा नसून महाराष्ट्राचा अभिमान आहे.
पहिल्यांदा नऊवारी साडी नेसताना ती अवघड वाटू शकते, पण योग्य पद्धत आणि काही सोप्या टिप्स वापरल्यास तुम्ही अवघ्या १० मिनिटांत परिपूर्ण पारंपरिक लूक मिळवू शकता.
साडी नेसण्यापूर्वी पायात योग्य पादत्राणे घाला. यामुळे साडीची उंची अचूक राखण्यास मदत होते.
साडीचे उजवे टोक घेऊन ते कमरेच्या मागच्या बाजूने पुढे आणा. आता दोन्ही भागांची नाभीच्या अगदी समोर कंबरेवर एक घट्ट गाठ मारा.
साडीचा डाव्या बाजूचा मोठा भाग पाठीमागून फिरवून पुढे आणा. त्याच्या सुंदर छोट्या चुण्या बनवून घ्या. हा पदर डाव्या खांद्यावरून मागे सोडा.
उरलेल्या कापडाच्या ५ ते ६ रुंद चुण्या पाडा. या निऱ्या एकत्र करून नाभीच्या खाली कंबरेमध्ये व्यवस्थित खोचा. याला नऊवारी साडीचा 'ओचा' म्हणतात.
उजव्या बाजूचा दीड मीटरचा भाग दोन्ही पायांच्या मधून मागे घेऊन जा. मागे नेलेले कापड व्यवस्थित पसरवून त्याच्या छोट्या निऱ्या करा आणि पाठीमागे कंबरेच्या मध्यभागी घट्ट खोचा.