Increase Child Appetite : मूल जेवताना नखरे करते? 'या' ५ सोप्या उपायांनी वाढेल मुलांची भूक

Anuradha Vipat

पालकांची डोकेदुखी

लहान मुलांची भूक न लागणे किंवा जेवताना नखरे करणे ही अनेक पालकांची मोठी डोकेदुखी असते.

Increase Child Appetite | agrowon

घरगुती उपाय

मुलांची भूक नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी आले, ओवा, लिंबू आणि वेळेवर जेवण्याची सवय हे सर्वात प्रभावी घरगुती उपाय आहेत.

Increase Child Appetite | agrowon

ओवा आणि कोमट पाणी

ओवा हा पोटाच्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे. यामुळे गॅस, अपचन दूर होऊन भूक वाढते. ओवा १ ग्लास पाण्यात उकळून घ्या. हे पाणी कोमट करून गाळून घ्या आणि दिवसातून २-३ वेळा मुलांना १-२ चमचे पाजा.

Increase Child Appetite | Agrowon

आले आणि मध

आल्यामध्ये पाचक रसांना उत्तेजित करण्याचे गुणधर्म असतात, ज्यामुळे भूक वाढण्यास मदत होते.

Increase Child Appetite | agrowon

लिंबू सरबत किंवा पुदिना

लिंबू आणि पुदिना पचनक्रिया वेगवान करतात. जठराग्नी प्रदीप्त करण्यासाठी हे दोन्ही पदार्थ खूप प्रभावी आहेत. दुपारच्या वेळी मुलांना कोमट पाण्यात थोडे लिंबू, कळे मीठ आणि जिरे पावडर टाकून लिंबू सरबत द्या.

Increase Child Appetite | Agrowon

जेवणापूर्वी पाणी किंवा दूध देणे टाळा

अनेक पालकांची सवय असते की मुले जेवत नाहीत म्हणून जेवण्याच्या अगदी आधी त्यांना दूध किंवा भरपूर पाणी देतात. यामुळे मुलांचे पोट भरते आणि ते जेवण्यास नकार देतात.

Increase Child Appetite | agrowon

शारीरिक कसरत आणि खेळ

आजकाल मुले दिवसभर टीव्ही किंवा मोबाईल समोर बसून राहतात. शारीरिक हालचाल न झाल्यामुळे कॅलरीज बर्न होत नाहीत आणि भूक लागत नाही

Increase Child Appetite | Agrowon

Calcium Foods For Kids : मुलांची हाडे आणि दात होतील मजबूत; आजच आहारात सुरू करा 'हे' कॅल्शियमयुक्त पदार्थ

Calcium Foods For Kids | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...