Mahesh Gaikwad
आजकाल बऱ्याच लोकांमध्ये दात पिवळे पडण्याची समस्या दिसून येते. दातांच्या पिवळेपणामुळे आत्मविश्वास कमी होतो.
जर तुमचेही दात पिवळे असतील आणि तुम्हालाही दातांचा पिवळेपणा घालवायचा असेल, तर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.
सकाळी उठल्यावर नारळ्याच्या तेलाने १० ते १५ मिनिटे गुळण्या करा. यामुळे दातांवरील डाग कमी होतात आणि तोंडातील जीवाणू नष्ट होतात.
थोडासा बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस तळहातावर एकत्र करून बोटाने दातांवर चोळा. यामुळे दातांवरील पिवळेपणा कमी होतो. हा उपाय आठवड्यातून एकदाच करा.
स्ट्रॉबेरीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, जे दात पांढरे करण्यास मदत करतात. यासाठी पिकलेल्या स्ट्रबेरीची पेस्ट करून दातांवर चोळा.
सफरचंद, गाजर, काकडी यासारख्या कुरकुरीत भाज्या आणि फळे खाल्ल्याने दातांवरील थर साफ होतो आणि नैसर्गिक पांढरेपणा टिकून राहतो.
कडू लिंब किंवा तुळशीची पाने चघळल्यामुळे दात मजबूत होतात. दात स्वच्छ करण्यासाठीचा हा नैसर्गिक आणि पारंपरिक उपाय आहे.
दूध, दही व पनीर यासारखे दुग्धजन्य पदार्थ नियमित खाल्ल्यामुळे दात अधिक मजबूत होतात आणि पांढरे दिसतात.