Anuradha Vipat
पार्लरमध्ये जाऊन महागडे गोल्ड फेशियल करण्यापेक्षा किचनमधील नैसर्गिक घटकांचा वापर करून तुम्ही चेहऱ्यावर गोल्डन ग्लो मिळवू शकता.
कापसाचा गोळा दुधात बुडवून संपूर्ण चेहरा स्वच्छ पुसून घ्या. यामुळे चेहऱ्यावरील धूळ आणि अशुद्धी निघून जाईल
साखर, मध आणि लिंबाचा रस हे मिश्रण चेहऱ्यावर लावून ५ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. यामुळे मृत त्वचा निघून जाईल
एलोवेरा जेल आणि हळद हे मिश्रण चेहऱ्यावर लावून १० मिनिटे मसाज करा. हळद नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल आहे आणि ती त्वचेला 'गोल्डन ग्लो' देण्यास मदत करते
बेसन, दही, मध आणि हळद हा पॅक चेहऱ्यावर लावून २० मिनिटे ठेवा. वाळल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा
फेशियल करण्यापूर्वी वाफ घेतल्यास पोअर्स उघडतात आणि रिझल्ट चांगला मिळतो
फेशियल झाल्यावर लगेच साबण वापरू नका. फेशियल नंतर सनस्क्रीन लावणे विसरू नका.