Anuradha Vipat
लवकर गर्भधारणा होण्यासाठी शरीर सुदृढ असणे आणि प्रजनन क्षमता उत्तम असणे आवश्यक आहे
साधारणपणे पाळी सुरू झाल्यापासून १२ ते १६ व्या दिवसाच्या दरम्यान स्त्रीबीज बाहेर पडते. या काळात संबंध ठेवल्यास गर्भधारणेची शक्यता सर्वाधिक असते
हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये आणि फळांचा आहारात समावेश करा. यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते .
भिजवलेले बदाम, अक्रोड आणि अंजीर शुक्रजंतू आणि स्त्रीबीजाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात.
जर तुम्हाला PCOS/PCOD चा त्रास असेल, तर कोमट पाण्यात दालचिनी पावडर टाकून प्यायल्याने मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते
अति वजन किंवा खूप कमी वजन गर्भधारणेत अडथळा आणू शकते. संतुलित वजन प्रजनन क्षमता सुधारते.
अल्कोहोल आणि धुम्रपान पूर्णपणे बंद करा, कारण यामुळे प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होतो