Eye Health : चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी 'या' पदार्थांचा आहारात समावेश कराच!

Mahesh Gaikwad

डोळ्यांची दृष्टी

डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी आणि चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी आहारात काही गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे.

Eye Health | Agrowon

पालक मेथी

पालक, मेथी, कोथिंबीर याध्ये ल्यूटिन आणि झेक्सॅन्थिन हे घटक असतात. जे डोळ्यांच्या पेशी मजबूत करून रेटिनाचे संरक्षण करतात.

Eye Health | Agrowon

अंडी

अंड्यातील पिवळा बलक ज्यामध्ये ल्यूटिन, झेक्सॅन्थिन आणि झिंक मुबलक प्रमाणात असते. यामुळे डोळ्यांचे स्नायू मजबूत होतात व नंबर वाढण्याची शक्यता कमी होते.

Eye Health | Agrowon

गाजर

गाजरामध्ये बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात आहे. जे शरीरात व्हिटामिन - ए मध्ये रुपांतरीत होते. ज्यामुळे दृष्टी सुधारते आणि नंबर वाढणे थांबते.

Eye Health | Agrowon

संत्री मोसंबी

संत्री, मोसंबी, लिंबू या लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटामिन - सी असते. जे डोळ्यांतील रक्तप्रवाह सुधारते आणि मोतीबिंदूचा धोका कमी करते.

Eye Health | Agrowon

बदाम

बदाम, अक्रोड, जवस आणि सुर्यफुलाच्या बिया यामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स असतात. जे डोळ्यांच्या कोरडेपणा कमी करतात आणि दृष्टी सुधारतात.

Eye Health | Agrowon

मासे

सॅल्मन, सार्डिन, ट्युना यासारखे माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स मिळतात. यामुळे दृष्टी स्पष्ट होते आणि डोळ्यांतील थकवा कमी होतो.

Eye Health | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....