Anuradha Vipat
मेकअप न करता नैसर्गिकरीत्या सुंदर आणि ताजेतवाने दिसण्यासाठी त्वचा निरोगी ठेवणे आणि आरोग्याची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे.
जेव्हा तुमची त्वचा आतून निरोगी असते, तेव्हा चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते.
दिवसातून दोनदा फेसवॉशने चेहरा धुवा. मॉइश्चरायझर नक्की लावा. रोज सनस्क्रीन लावणे विसरू नका.
दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी प्या. आहारात फळे, हिरव्या पालेभाज्या आणि सुक्या मेव्याचा समावेश करा.
भुवयांना चांगला आकार दिल्यामुळे चेहऱ्याची ठेवण लगेच बदलून जाते . ओठ फुटू नयेत म्हणून चांगला लिप बाम वापरा. तुमचे केस नेहमी स्वच्छ आणि विंचरलेले असावेत.
महागडे कपडे घालण्यापेक्षा व्यवस्थित फिटिंगचे, स्वच्छ आणि इस्त्री केलेले कपडे घालण्यावर भर द्या.
चालताना किंवा बसताना नेहमी ताठ बसा. योग्य पोश्चरमुळे तुमचा लूक अधिक आत्मविश्वासी आणि आकर्षक वाटतो.