Aslam Abdul Shanedivan
नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड ही भारतातील खत निर्मिती करणारी सर्वात मोठी सरकारी कंपनी आहे.
एनएलएफ ही देशातील सर्वात मोठी सरकारी युरिया उत्पादन कंपनी असून याची स्थापना ऑगस्ट १९७४ मध्ये झाली.
या कंपनीची खत उत्पादने ‘किसान’ या ब्रँडखाली बाजारात विकली जातात.
सध्या पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांमध्ये पाच गॅस-आधारित अमोनिया-युरिया उत्पादन युनिट चालवते जात आहेत. येथे नॅनो युरिया तयार केली जाते.
आता कंपनीने शुक्रवारी (ता.२५) एक मोठी घोषणा केली. कंपनी मध्य प्रदेशमध्ये २०८ कोटी रुपये खर्च करून नव्या युनिटची स्थापना करणार आहे. येथे पाण्यात विरघळणारी खते तयार केली जातील.
याचवेळी कंपनीने पंजाबमधील नांगल येथील नॅनो युरिया सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे नॅनो युरिया युनिट बंद केल्याने नॅनो युरियाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.