Anuradha Vipat
नरक चतुर्दशीच्या दिवशी केवळ अभ्यंगस्नान नव्हे, तर घरातील दारिद्र्य आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही अत्यंत सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत.
या दिवशी केलेले हे उपाय घरात सुख, समृद्धी आणि अखंड लक्ष्मी आणण्यास मदत करतात.
नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे संपूर्ण घराची स्वच्छता करावी. घर पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ टाकावे. मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेते.
अभ्यंगस्नानानंतर घराच्या मुख्य उंबरठ्याची पूजा करावी. उंबरठ्याला थोडे उटणे आणि हळद-कुंकू लावावे. मुख्य प्रवेशद्वारावर झेंडूच्या फुलांचे आणि आंब्याच्या पांनांचे तोरण लावावे.
नरक चतुर्दशीला घरातील असा सर्व 'कचरा' घराबाहेर फेकून द्यावा. घर पूर्णपणे स्वच्छ आणि सुगंधी ठेवावे.
संध्याकाळी प्रदोष काळात यमराजासाठी दक्षिण दिशेला चौमुखी दिवा नक्की लावावा. याशिवाय, रात्रीच्या वेळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना मोहरीच्या तेलाचे दिवे लावावेत.
नरक चतुर्दशीच्या संध्याकाळी घरातील देव्हाऱ्यात कापूर आणि २ लवंगा एकत्र जाळाव्यात आणि त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये दाखवावा. या उपायामुळे घरातील वास्तू दोष दूर होतो .