Anuradha Vipat
आज दिवाळीची सणाची पहिली अंघोळ आहे. खऱ्या अर्थाने दिवाळी सणाला आजपासून सुरुवात झाली आहे.
आज नरक चतुर्दशी आहे. आज आपण पाहूयात नरक चतुर्दशी पूजा कशी करायची.
आज सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. यालाच 'पहिली अंघोळ' असेही म्हणतात.
आज नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून पायाखाली कडू फळ फोडतात
आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि हनुमानाची पूजा करावी.
आज संध्याकाळच्या वेळी यमराजासाठी दिवा लावावा.
पूजा नेहमी शुभ मुहूर्तावरच करावी. पंचांगानुसार योग्य वेळ पाहून पूजा करावी.