Anuradha Vipat
दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. आपल्याकडे नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी' म्हणतात पण का?आज आपण ते जाणून घेऊयात.
दिवाळी सणाची सुरुवात धनत्रयोदशीने होते आणि नरक चतुर्दशी हा दुसरा दिवस असतो.
नरक चतुर्दशी हा दिवस मोठ्या दिवाळीच्या आदल्या दिवशी साजरा होत असल्याने याला 'छोटी दिवाळी' म्हणतात.
नरक चतुर्दशी दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता
नरक चतुर्दशी दिवशी भगवान श्रीकृष्णाने १६,००० स्त्रियांची नरकासुरपासून सुटका केली होती.
नरकासुराच्या वधानंतर सर्वत्र दिवे लावून आनंद व्यक्त करण्यात आला होता
नरक चतुर्दशीच्या दिवशी घरातील रोगराई, कर्ज आणि नकारात्मकता दूर केली जाते.