Anuradha Vipat
कोणताही सण असो सणाला गोड खाणे गरजेचे आहे. आज आपण सणासुदीला घरी खव्याचे गुलाबजामून बनवण्याची ही एक सोपी आणि हटके रेसिपी पाहणार आहोत
आम्ही दिलेली ही हटके रेसिपी ज्यामुळे गुलाबजामुन मऊ आणि लुसलुशीत होतील.
खवा - २५० ग्रॅम, मैदा - ४ टेबलस्पून, रवा - १ चमचा , बेकिंग सोडा - १ चिमूट, वेलची पूड - १/२ चमचा, दूध - २-३ चमचे, तळण्यासाठी तेल किंवा तूप .
साखर - २ कप , पाणी - २ कप, वेलची पूड - १/२ चमचा, केशर , गुलाबपाणी - १ चमचा
साखर आणि पाणी एकत्र करून मध्यम आचेवर साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ५-७ मिनिटे ठेवा. थोडासा चिकटसर पाक झाला की त्यात वेलची पूड, केशर आणि गुलाबपाणी घालून चांगले मिसळून घ्या.
खवा चांगला मळून घ्या त्यात मैदा, रवा , बेकिंग सोडा आणि वेलची पूड घालून सर्व मिश्रण चांगले एकजीव करा. छोटे-छोटे गोळे करून घ्या.
गुलाबजामुन जास्त गरम तेलात तळू नका. गुलाबजामुन पाकात ३० मिनिटे ते १ तास भिजत ठेवा. खमंग आणि रसरशीत खव्याचे गुलाबजामुन खाण्यासाठी तयार आहेत.