Anuradha Vipat
दिवाळीतील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र मानला जाणारा सण म्हणजे 'नरक चतुर्दशी'.
या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी अंगाला तेल आणि उटणे लावून स्नान करण्याची (अभ्यंगस्नान) प्राचीन परंपरा आहे.
वर्ष २०२६ मध्ये तिथीच्या बदलामुळे रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ रोजी नरक चतुर्दशी साजरी केली जाणार आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी संध्याकाळी लक्ष्मीपूजन देखील आहे.
यंदा नरक चतुर्दशीच्या स्नानासाठी पहाटे १ तास ३२ मिनिटांचा अतिशय उत्तम काळ लाभत आहे.
अभ्यंगस्नान तारीख: रविवार, ८ नोव्हेंबर २०२६
अचूक शुभ मुहूर्त: पहाटे ०५:१४ ते सकाळी ०६:४६ पर्यंत
७ नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ०६:४४ वाजल्यापासून
चतुर्दशी तिथी समाप्ती: ८ नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ०४:५१ वाजेपर्यंत (त्यानंतर अमावस्या सुरू होईल व लक्ष्मीपूजन केले जाईल).
स्नानाला बसण्यापूर्वी घराच्या उंबरठ्यावर किंवा बाथरुमच्या बाहेर 'कारिट' डाव्या पायाच्या अंगठ्याने चिरडावे.
स्नान आटोपल्यानंतर नवीन वस्त्र परिधान करून घरातील देवांचे दर्शन घ्यावे आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावेत.