Anuradha Vipat
आपल्याकडे नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी' म्हणतात. नरक चतुर्दशीला काही खास गोष्टी करणे शुभ मानले जाते आणि काही गोष्टी करणे अशुभ.
नरक चतुर्दशी हा दिवस वाईटाचा नाश आणि चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी महत्त्वाचा असतो
नरक चतुर्दशी या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंग स्नान करावे.
नरक चतुर्दशीच्या संध्याकाळी यमराजासाठी दिवा लावावा .यामुळे अकाली मृत्यूचे भय दूर होते.
नरक चतुर्दशीच्या दिवशी मांसाहार, मद्यपान आणि तामसी भोजन करणे टाळावे.
नरक चतुर्दशीच्या दिवशी कुटुंबातील सदस्य किंवा इतरांशी वाद घालणे टाळावे.
नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण, यमराज, हनुमान आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी.