Anuradha Vipat
अभ्यंगस्नान म्हणजे तेल, उटणे आणि अत्तर लावून स्नान करणे. अभ्यंगस्नान नरकचतुर्दशीच्या दिवशीही पहाटे सूर्योदयापूर्वी केले जाते.
दिवाळी सणातील अभ्यंगस्नानाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व दिले गेले आहे.
नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून १६ हजार स्त्रियांची सुटका केली होती
या युद्धानंतर श्रीकृष्णाने अभ्यंग स्नान करून शरीर शुद्ध केले तेव्हापासून अभ्यंग स्नान ही परंपरा सुरू झाली.
अभ्यंग स्नानानंतर यमदीप दान करण्याचा विधी केला जातो.
अभ्यंग मसाज केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूंना आराम मिळतो.
अभ्यंग स्नानानंतर स्वच्छ आणि नवीन वस्त्र परिधान करणे गरजेचे आहे.