Napier Grass Cultivation : उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची गरज भागविण्यासाठी नेपियर गवत

Team Agrowon

बहुवार्षिक चारा पीक

नेपीयर गवत पूर्वी हत्ती गवत म्हणून ओळखलं जात होतं. नेपियर गवत हे बहुवार्षिक असल्यामुळे एकदा लागवड केल्यानंतर दोन ते तीन वर्षांपर्यंत या चारा पिकापासून उत्पादन मीळत राहतं.

Napier Grass Cultivation | Agrowon

गवताची लागवड

नेपियर गवताला हत्ती गवत असंही म्हणतात. साधारण फेब्रुवारी - मार्च मध्ये या गवताची लागवड करता येते.  

Napier Grass Cultivation | Agrowon

जमीन तयार करणे

नेपियर लागवडीसाठी एक खोल नांगरणी आणि २ ते ३ वेळा वखरणी करून जमीन तयार करावी. लागवडीपूर्वी उभ्या-आडव्या नांगरटी करून, दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी.

Napier Grass Cultivation | Agrowon

खत व पाणी व्यवस्थापन

शेवटच्या कुळवणीच्या वेळी चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. या पिकाच्या लागवडीला उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. खत व पाणी व्यवस्थापन योग्य प्रमाणात दिल्यास या गवताची लागवड तीन वर्षांपर्यंत टिकते.

Napier Grass Cultivation | Agrowon

लागवडीतील अंतर

नेपियर गवताची कांडी ४ फूट x २ फूट अंतरावर लावल्यास चारा उत्पादन मुबलक मिळते. ४ फुटाची सरी केल्यामुळे आंतरमशागती सोबतच चारापिकास पाणी देणे सोयीचे जाते.

Napier Grass Cultivation | Agrowon

लागवड कधी करावी?

उन्हाळ्यात फेब्रुवारी ते मार्च या महिन्यांत या गवताची लागवड करावी. याची लागवड ठोंबे मुळासह लावून करावी.

Napier Grass Cultivation | Agrowon

दोन ठोंब्यांतील अंतर

तीन महिने वाढ झालेल्या गवताच्या खोडाचा जमिनीकडील दोन तृतीयांश भागातील दोन ते तीन डोळे असणाऱ्या कांड्या काढून लावल्यास त्या चांगल्या फुटतात. सरासरी दोन ठोंब्यांतील अंतर ९० x ६० सें. मी. ठेवून लागवड केल्यास आंतरमशागत करणे सुलभ जाते.

Napier Grass Cultivation | Agrowon