Aslam Abdul Shanedivan
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतामरण यांनी आज नव्या संसदेमध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी गरीब, महिला, देशातील युवा आणि शेतकऱ्यांना अग्रभागी ठेवत विशेष स्थान दिले. यावेळी कृषी क्षेत्रासाठी अनेक घोषणा केल्या.
देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम इफको करत आहे. इफकोने नॅनो युरिया आणि डीएपीची निर्मिती केली असून जे उत्पन्न वाढवण्यास मदत करते
मात्र नॅनो युरिया आणि डीएपी यांच्या वापराआधी त्याच्या वापराच्या पद्धती जाणून घेतल्या पाहिजेत. कारण वापरण्याच्या पद्धतींमध्ये थोडीशी चूक झाली तर शेतकऱ्यांना नफ्याऐवजी तोटा सहन करावा लागू शकतो.
इफकोने नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीची निर्मिती केली असून यामुळे युरियाचा वाहतूक खर्च आणि साठवणूक खर्च दोन्ही कमी झाले आहेत
याचे कारण म्हणजे नॅनो युरियाची अर्धा लिटरची बाटली युरियाच्या ५० किलोच्या पिशवीइतकेच लाभदायक आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतात पोते घेऊन जाण्याची गरज भासणार नाही. तर शेतकऱ्यांच्या अडचणीही कमी झाल्या आहेत.
इफको सोशल मीडियावर नॅनो युरियाचा वापर कसा करायचा याबाबतचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. ज्यात बियाणे पेरण्यापूर्वी एका कंटेनरमध्ये सुमारे ५० किलो बियाणे घेऊन ते २५० मिली इफको नॅनो डीएपीत ठेवावीत. म्हणजे बिया डीएपी शोषून घेतील. त्यानंतर ते बियाणे शेतात पेरावे.
पेरणीनंतर २०-२५ दिवसांनी पिक उगवल्यावर २५० मिली नॅनो डीएपी १०० ते १२५ लिटर पाण्यात मिसळून प्रत्येकी १६ लिटर क्षमतेच्या आठ टाक्यांमध्ये समान प्रमाणात टाकून घ्यावे. त्यानंतर एक एकर शेतात फवारणी करावी. एका एकरास २५० मिली नॅनो डीएपी पुरेशी आहे.