Aslam Abdul Shanedivan
मुली असो वा मुले त्यांना कोणत्या कोणत्या कारणामुळे आपल्या नावात आणि पत्त्यात बदल हा करावा लागतो. पत्त्यात बदल हा काम, शिक्षण आणि इतर कारणांमुळे होत असतो. पण नावात बदल हा अधिकतर मुलींना करवा लागतो. तो त्यांच्या लग्नामुळे....
लग्नानंतर अनेक मुलींना आपले नाव हे बदलावे लागते. समजा नाव नाही बदलले तरी त्यांचा पत्ता मात्र बदतो आणि त्यांचे अडनाव. त्यामुळे त्यांना त्यांच्या कागदपत्रांमध्ये पूर्वीचे आडनावाऐवजी नवे आडनाव टाकावे लागते. त्यासाठी आधार कार्ड फार महत्वाचे असते. तेही नव्या नावासह आणि बदलांसह... मग काय कराल?
लग्नानंतर अनेक मुलींना त्यांचे नाव आणि अडनाव हे बदलावं लागत. पण हे करावं लागतच का? तर नाही असे काहीच नाही. त्यांना आपले नाव बदलण्याची गरज नाही.
पण पालकांच्या नावात बदल होत असतील आणि अडचणी निर्माण होत असतील तर मुलीचे म्हणजे आईचे नाव बदलले जाते.
मुलींना त्यांचे नाव आणि अडनाव सोडावे लागते ही आपली संकृती आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हे मुलीच्या लग्नानंतर तिच्या नावात आणि अडनावात बदल हा होतोच. पण कायदेशीरदृष्ट्या हे गरजेचे नाही.
लग्नानंतर नावात बदल करण्याची गरज नसल्याने त्या स्त्रीने फक्त तिच्या नावासोबत तिच्या पतीच्या आडनावाची नोंद सर्व कागदपत्रांवर करून घ्यावी. म्हणजेच तिच्या सर्व कागदपत्रांवर नवीन आडनाव अपडेट करून घ्यावे. त्यासाठी आधी आधार कार्डवरील आडनाव अपडेट करून घ्यावे.
आधार कार्डमध्ये कोणतेही बदल करण्यासाठी तुम्हाला uidai च्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल. किंवा याबाबत सुरू असणाऱ्या आधार कार्ड अपडेट सेंटरला भेट द्यावी लागेल. तेथे जाऊन जे नाव किंवा आडनाव हवे बदलू शकता. त्याचवेळी पत्ता देखील बदलता येतो.