Anuradha Vipat
नखांची नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी आणि ती मजबूत ठेवण्यासाठी खालील काही प्रभावी घरगुती उपाय तुम्ही फॉलो करू शकता.
कोमट ऑलिव्ह ऑइलने नखांना आणि क्युटिकल्सला दररोज ५-१० मिनिटे मालिश केल्याने नखांना नैसर्गिक चमक मिळते.
व्हिटॅमिन ई युक्त बदाम तेल नखांचा कोरडेपणा दूर करून त्यांना निरोगी ठेवते.
लिंबाच्या रसाने नखांना घासल्याने पिवळेपणा दूर होतो आणि नैसर्गिक चमक येते.
ताज्या कोरफडीच्या जेलने १०-१५ मिनिटे मालिश केल्यास नखांची वाढ सुधारते आणि ती चमकदार दिसतात.
नखांच्या आरोग्यासाठी आहारात बायोटिन, प्रोटीन, लोह आणि जस्त युक्त पदार्थांचा समावेश करा.
भरपूर पाणी पिऊन स्वतःला हायड्रेटेड ठेवा, ज्यामुळे नखे ठिसूळ होत नाहीत