Sanjana Hebbalkar
रोजच्या दैनंदिनीमध्ये आपण वेगवेगळ्या फळभाज्या, पालेभाज्या खात असतो. भाज्याची किंमत सहसा कमी असते.
अशी एक भाजी आहे ज्याची किंमत मटणापेक्षा जास्त आहे. इतकचं नव्हे तर या भाजीची चोरी देखील होते.
उत्तरप्रदेश राज्यात कटरूआ नावाची भाजी आहे. या भाजीची चक्क तस्करीदेखील केली जाते. काहीजणांनी यासाठी जीव देखील गमवला आहे.
या भागात मात्र आदिवासी भाग जास्त आहे. शिवाय ज्या ठिकाणी ही भाजी लागवड केली जाते त्या भागाला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे.
याठिकाणी यामुळे कोणीही जाऊ शकत नाही. गेल्यास त्यांना शिक्षा केली जाते त्यामुळे या प्रकल्पाच्या ठिकाणी संरक्षक देखील असतात.
या भाजीला शाकाहारी मटण म्हणलं जातं याचं कारण म्हणजे याची चव मांसाहारीसारखी लागते प्तर याला बनवण्याची पद्धत देखील मांसाहाराप्रमाणे आहे.
या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आहेत. डायबेटीज आणि ह्रद्यरोगांच्या रुग्णांना या भाजीचा प्रचंड फायदा होतो. सुस्ती आणि शरीरात असणारा अशक्तपणा दूर होतो.