Anuradha Vipat
आज आम्ही तुम्हाला दिवाळीसाठी आरोग्यदायी आणि पौष्टिक नाचणीचे लाडू बनवण्याची एक सोपी रेसिपी सांगणार आहोत.
नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम आणि फायबर असल्यामुळे हे लाडू पौष्टिक तसेच चविष्ट लागतात.
नाचणीचे पीठ - २ कप, किसलेला गूळ - १.५ कप, साजूक तूप - १/२ कप, सुकामेवा - १/२ कप, वेलची पूड - १/२ चमचा, खसखस - १ चमचा , डिंक - १-२ चमचे
साजूक तूप गरम करून त्यात नाचणीचे पीठ मंद आचेवर सोनेरी आणि खमंग वास येईपर्यंत भाजा.
कढईत थोडे तूप घालून बारीक चिरलेला सुकामेवा आणि खसखस भाजून घ्या.डिंकही तुपात तळून घ्या
भाजलेले नाचणीचे पीठ, सुकामेवा, खसखस आणि वेलची पूड एकत्र करा.मिश्रणात किसलेला गूळ घाला.
हाताला थोडे तूप लावून मिश्रणाचे लहान-लहान लाडू वळा.