Anuradha Vipat
झणझणीत आणि अस्सल गावरान चवीचे 'रानटी मटण खर्डा' बनवण्यासाठी तुम्ही खालील रेसिपी फॉलो करा.
मटण, १५-२० हिरव्या मिरच्या , लसूण पाकळ्या, आले, कोथिंबीर, जिरे. कांदे, खोबरे ,तेल, मीठ, हळद, गरम मसाला किंवा मटण मसाला.
सर्वप्रथम मटणाला हळद आणि मीठ लावून मटण ७०-८० शिजवून घ्या. तेलात हिरव्या मिरच्या आणि लसूण भाजून घ्या. भाजलेल्या मिरच्या, लसूण, आले, जिरे आणि कोथिंबीर घालून जाडसर ठेचून घ्या.
तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा परता. त्यानंतर त्यात तयार केलेला हिरव्या मिरचीचा खर्डा घालून २-३ मिनिटे चांगले परता.
शिजवलेले मटण आणि भाजलेले सुके खोबरे घाला. चवीनुसार मीठ आणि मटण मसाला टाकून सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करा.
मटणाला कढईवर झाकण ठेवून ५-७ मिनिटे वाफ काढा. मटणाला खर्ड्याचा मसाला पूर्णपणे लागायला हवा.
वरतून भरपूर ताजी कोथिंबीर टाका. तयार आहे तुमची झणझणीत मटण खर्डा रेसिपी!