Weight Loss Snacks : चुरमुऱ्याचा चिवडा खाऊन करा वजन कमी ; वेटलॉससाठी होईल फायदा

Mahesh Gaikwad

संतुलित आहार

आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेकांना संतुलित आहार घेणे शक्य होत नाही. अशावेळी फास्टफूड, जंकफूड खाऊन भूक भागवली जाते. परिणामी वजन वाढण्यास कारणीभूत ठरते.

Weight Loss Snacks | Agrowon

वजन वाढण्याची समस्या

याशिवाय बदलती जीवनशैली आणि कामाचा ताण यामुळेही वजन वाढण्याची समस्या सामान्य झाली आहे.

Weight Loss Snacks | Agrowon

डायटींग

वाढलेले वजन प्रत्येकालाच कमी करायचे आहे. पण त्यांना व्याायामासाठी वेळ मिळत नाही. अशावेळी लोक आपला आहार कमी करून डायटींग सुरू करतात.

Weight Loss Snacks | Agrowon

चटकदार पदार्थ

आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थाबद्दल सांगणार आहोत. जे खाण्यासाठी चटकदार तर आहेच पण यामुळे तुमचे वाढलेले वजन कमी होण्यासही मदत होईल.

Weight Loss Snacks | Agrowon

चुरमुऱ्याचा चिवडा

आपल्या भारतीय घरांमध्ये चुरमुऱ्याचा चिवडा सर्रास केला जातो. चहासोबत किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये चिवडा आपण खातो.

Weight Loss Snacks | Agrowon

चिवडा

एका किलो चुरमुऱ्यापासून तुम्ही डब्बा भरून चिवडा तयार होतो. चिवडा स्नॅक्सचा असा पदार्थ आहे, जो तुम्ही चालता-फिरता, घरी, ऑफिसमध्ये कुठेही आणि कधीही खाऊ शकता.

Weight Loss Snacks | Agrowon

पोषक घटक

चुरमुऱ्याच्या चिवड्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रथिने आणि जीवनसत्त्वे असे पोषक घटक असतात. जे तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. ही बातमी सामान्य माहितीवर आधारीत आहे.

Weight Loss Snacks | Agrowon