Mahesh Gaikwad
मुंबईतील डब्बेवाले हे अचूक आणि योग्य ठिकाणी योग्य वेळेवर कोणतीही चूक न करता जेवणाचे डब्बे पोहोचविण्यासाठी जगभरात ओळखले जातात.
१८९० सालाच्या सुमारास डब्बेवाल्यांची मुंबईत डब्बा सेवा सुरू केली. ब्रिटीश काळात ऑफिसला जाणाऱ्यांना घरचे जेवण मिळावे, यासाठी ही सेवा सुरू झाली.
डब्बेवाले रंग, चिन्हे आणि कोड प्रणाली वापरून जेवणाचे डब्बे योग्य ठिकाणी पोहोच करतात. ही पद्धत इतकी अचूक आहे की, चूक होण्याची शक्यता जवळपास शून्य आहे.
डब्बे पोहचविण्यासाठी डब्बेवाले सायकल, लोकल ट्रेन आणि हातगाड्यांचा वापर करून रोज लाखो डब्बे पोहोच करतात.
आपल्या वेळ पाळण्याच्या व्यवस्थापनासाठी डब्बेवाले जगभरात प्रसिध्द आहेत. त्यांची ही पध्दत जगभर अभ्यासली जाते.
हार्वर्ड बिझनेस स्कूलने डब्बेवाल्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला आहे. ब्रिटनच्या प्रिन्स चार्ल्स यांनीही मुंबईच्या डब्बेवाल्याची त्यांची भेट घेतली आहे.
नव्या युगाशी जुळवून घेत डब्बेवाले आता अॅप्स आणि ऑनलाइन बुकिंग सेवांशी जोडले गेले आहेत.
मुंबईत डब्बेवाले केवळ जेवण पोचवणारे नाहीत, तर मुंबईच्या संस्कृतीचा, मेहनतीचा आणि एकतेचे जीवंत उदाहरण आहेत.