Anuradha Vipat
आज मुंबईला अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
सोमवारी आणि मंगळवारी पावसामुळे मुंबई अनेक ठिकाणं ठप्प झाली होती.
मुंबईसह अनेक ठिकाणी रेड-अलर्ट देण्यात आला असून शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
अतिमुसळधार पावसामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण 100 टक्के भरले आहे.
धरणाच्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढणार असल्याचे जाहिर केले आहे
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत स्थानिक नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
आज मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे