Anuradha Vipat
घरी मुंबई स्टाईल चटपटीत शेव पुरी बनवण्यासाठी खालील रेसिपी फॉलो करा.
पापडी, बटाटे,कांदा व टोमॅटो, हिरवी तिखट चटणी, चिंच-गुळाची गोड चटणी, लसूण-लाल तिखट चटणी, शेव, चाट मसाला, लाल तिखट, जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ,बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस.
प्लेटमध्ये १०-१२ कुरकुरीत पापडी नीट पसरवून ठेवा. प्रत्येक पापडीवर थोडे स्मॅश केलेले बटाटे ठेवा.
बटाट्यावर थोडा बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घाला. प्रत्येक पुरीवर आधी हिरवी चटणी, नंतर लसूण चटणी आणि शेवटी गोड चिंचेची चटणी तुमच्या आवडीनुसार घाला.
थोडे मीठ, लाल तिखट, जिरे पावडर आणि चाट मसाला शिंपडा. भरपूर प्रमाणात बारीक शेव टाका आणि वरून कोथिंबीर तसेच थोडे लिंबू पिळून सजवा.
शेव पुरी तयार झाल्यावर लगेच सर्व्ह करा, अन्यथा पुऱ्या मऊ पडू शकतात.
शेव पुरी हा मुंबईचा अतिशय लोकप्रिय चटपटीत पदार्थ आहे