Aslam Abdul Shanedivan
मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून ते उद्योग, व्यापार आणि उंच उंच इमारतींनी वेढलेलं आहे. हे शहर २४ तास अव्याहतपणे धावणारे आणि गर्दीने भरलेलं आहे
मुंबई कला, संस्कृती आणि परंपरेने नटलेलं शहर असून यावर आपल्यासह पाश्चात्य संस्कृतीचा पगडा आहे.
तर अशा या गजबजलेलं आणि गर्दीने भरलेल्या शहरात असे एक अद्भूत गाव असून जे पाहण्यासाठी देश विदेसातून लोक येतात
अशा या गावाचे नाव खोताची वाडी असून ते मलबार हिल्सच्या पायथ्याशी वसलेलं आहे. येथे कोळी आणि पाठारे प्रभू समाजातील लोक राहतात.
वामन हरी खोत यांच्या नावावरून या गावाचं नाव खोताची वाडी असं पटलं आहे. तर खोत यांनी जमिनीचे तुकडे पाडून ख्रिश्चन समुदायांना दिले होते
तर हे गाव पोर्तुगीज शैलीच्या वास्तू कलेचा नमुना असून येथील घरे घरे रंगबिरंगी आहेत.
पूर्वी येथे पोर्तुगीज शैलीची ६५ घरे होती जी आता २८ वर आली आहेत. येथे फिरताना पोर्तुगालमध्ये फिरल्याचा भास होतो.