Mahesh Gaikwad
आयुर्वेदामध्ये दालचिनीचा वापर यामध्ये आढळणाऱ्या औषधी गुणधर्मांमुळे विविध आजारांवर औषधी म्हणून केला जातो.
अलिकडच्या काळात शरीराच्या वाढलेल्या वजनाच्या समस्यमुळे अनेकजण चिंतेत आहेत. वजन कमी करण्यासाठी ना ना तऱ्हेचे उपाय लोक करतात.
जर तुम्हालाही वाढलेल्या वजनाची चिंता सतावत असेल, तर वजन कमी करण्यासाठी तुम्ही दालचिनीचा वापर करू शकता.
दालचिनीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. दालचिनीची पाने, साल, मूळ आणि याच्यापासून केलेल्या तेलाचा वापर उपचारांसाठी केला जातो.
दालचिनीचे सेवन केल्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी मदत होते. परंतू याचे प्रमाणापेक्षा अधिक सेवन करणे टाळावे.
मधामध्ये दालचिनीची पावडर घालून तयार केलेल्या मिश्रणाचे सेवन केल्यास वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
याशिवाय दालचिनीमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे त्वचा आणि पचनाच्या समस्येपासून आराम देतात. ही बातमी सामान्य माहितीवर आधारीत असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.