Mahesh Gaikwad
गंभीर आजाराच्या निदानासाठी एमआरआय टेस्ट केली जाते. यामध्ये चुंबकीय लहरींच्या माध्यमातून शरीराच्या अंतर्गत रचनांची तपासणी करतात.
एमआरआयी तपासणीपूर्वी खबरदारी घेणे आवश्याक असते. आपल्या शरीरात पेसमेकर, क्लिप, कृत्रिम सांधे, किंवा धातूच्या वस्तू असल्यास डॉक्टरांना आधीच कल्पना द्यावी.
एमआरआय करण्यापूर्वी अंगावरील सर्व दागिने, घड्याळे, चश्मा, पिन्स यासारख्या धातूच्या वस्तू काढून ठेवाव्यात.
एमआरआय स्कॅनिंगदरम्यान हालचाल केल्यास प्रतिमा अस्पष्ट होते. त्यामुळे तपासणी होईपर्यंत पूर्ण वेळ स्थिर आणि शांत राहणे आवश्यक असते.
एमआरआय स्कॅनपूर्वी आपल्याला हॉस्पिटलकडून विशिष्ट प्रकारचा मेडिकल गाऊन दिला जातो. हा गाऊन परिधान करूनच स्कॅनिंग करावे.
एमआरआय तपासणीची मशिन बंदिस्त खोलीत असते. जर तुम्हाला एमआरआय करताना अस्वस्थ वाटत असेल, तर डॉक्टरांना सांगावे
गर्भधारणेच्या सुरुवातीच्या टप्प्यात एमआरआय न करण्याचा सल्ला दिला जातो. खूपच गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ल्यानुसार निर्णय घ्यावा.
एमआरआय ही एक सुरक्षित तपासणी प्रक्रिया आहे. स्कॅन झाल्यानंतर तुम्हाला लगेचच दैनंदिन कामे करता येतात.