Anuradha Vipat
नात्यामध्ये दुरावा येणे किंवा ब्रेकअप होणे हा कोणत्याही व्यक्तीसाठी अत्यंत कठीण आणि मानसिकदृष्ट्या थकवणारा काळ असतो.
या मानसिक धक्क्यातून बाहेर पडून स्वतःला पुन्हा सावरण्यासाठी खालील उपाय अत्यंत प्रभावी ठरतात.
दुःख दाबून ठेवू नका. रडू येत असल्यास रडा. आपल्या भावना मित्र किंवा जवळच्या व्यक्तीजवळ व्यक्त करा.
सोशल मीडियावर त्यांच्या प्रोफाईलवर नजर ठेवणे किंवा वारंवार मेसेज करणे टाळा .
मानसिक तणावात अनेकदा जेवण सुटते किंवा झोप लागत नाही. परंतु, सकस आहार घेणे, पुरेशी झोप घेणे आणि रोज हलका व्यायाम करा.
रिकामा वेळ नकारात्मक विचारांना आमंत्रण देतो. त्यामुळे तुमचे मन नवीन गोष्टी शिकण्यात, वाचनात, गाणी ऐकण्यात किंवा प्रवासात गुंतवून ठेवा.
जर तीव्र नैराश्य, सतत नकारात्मक विचार येत असतील आणि दैनंदिन आयुष्यावर परिणाम होत असेल, तर थेरपिस्ट किंवा मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या .