Homemade Ghee Recipe : घरच्या घरी गाईचे शुद्ध, सुवासिक आणि दाणेदार तूप बनवण्याची सोपी पद्धत

Anuradha Vipat

शुद्ध आणि सुवासिक तूप

घरच्या घरी गाईचे शुद्ध आणि सुवासिक तूप बनवणे खूप सोपे आहे.

Homemade Ghee Recipe | agrowon

तूप

खाली दिलेल्या सोप्या पायऱ्या फॉलो करून तुम्ही दाणेदार आणि पिवळधमक तूप तयार करू शकता.

Homemade Ghee Recipe | Agrowon

साहित्य

दूधाची साय (मलाई), थंड पाणी किंवा बर्फाचे खडे,दही.

Homemade Ghee Recipe | agrowon

सोपी पद्धत

रोज दूध तापवून ते पूर्ण गार झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे दुधावर जाड साय धरते. तूप बनवण्याच्या आदल्या रात्री साय फ्रीझरमधून बाहेर काढा. ती रूम टेम्परेचरवर आली की त्यात १ चमचा दही घालून विरजण लावा आणि रात्रभर बाहेरच ठेवा.

Homemade Ghee Recipe | Agrowon

लोणी काढणे

सकाळी हे विरजलेले मिश्रण एका मोठ्या भांड्यात किंवा मिक्सरच्या भांड्यात काढा. त्यात थोडे थंड पाणी किंवा बर्फाचे खडे टाका आणि मिक्सर किंवा रवीच्या साहाय्याने ५-७ मिनिटे घुसळा. वर आलेले लोणी हाताने गोल गोळे करून वेगळे काढा आणि थंड पाण्याने २-३ वेळा स्वच्छ धुवून घ्या .

Homemade Ghee Recipe | agrowon

तूप कढवणे

लोणी एका जाड बुडाच्या कढईत मंद आचेवर गरम करायला ठेवा. लोणी वितळल्यावर ते सतत ढवळत राहा. मंद आचेवर कढवत असताना हळूहळू हा पांढरा भाग खाली बसेल आणि सोनेरी रंगाचे स्वच्छ तूप वर येईल.

Homemade Ghee Recipe | agrowon

तूप गाळणे आणि साठवणे

तुपाचा सुगंध अधिक वाढवण्यासाठी तुम्ही गॅस बंद करण्यापूर्वी त्यात एक तुळशीचे पान किंवा लवंग टाकू शकता. तूप थोडे कोमट झाल्यावर ते काचेच्या किंवा स्टीलच्या स्वच्छ बरणीत गाळणीने गाळून घ्या.

Homemade Ghee Recipe | Agrowon

Horoscope 20 September 2026 : आज 'या' राशीच्या लोकांची संयमामुळे सर्व कामे सुरळीत पूर्ण होतील

Horoscope 20 September 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...