Anuradha Vipat
मदर्स डे निमित्त आईशी संवाद साधताना तिला तिच्या आयुष्याबद्दल आणि तिच्या स्वप्नांबद्दल जाणून घेणे तिला अधिक सुखावणारे ठरेल.
"आई, तू लहान असताना तुला मोठं होऊन काय बनायचं होतं? तुझे आवडते छंद कोणते होते जे नंतर मागे सुटले?"
"तुमच्या जन्मानंतर किंवा संसाराच्या सुरुवातीच्या काळात तुला कोणत्या गोष्टींचा सर्वाधिक ताण आला होता?
तुला माझ्या कोणत्या सवयीचे सर्वात जास्त कौतुक वाटते?
"अशी कोणती गोष्ट किंवा ठिकाण आहे जिथे तुला खूप जायची इच्छा आहे.
"आयुष्याकडून तू शिकलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती?
"असा कोणता पदार्थ किंवा काम आहे जे केल्यावर तुला स्वतःसाठी खूप आनंद मिळतो?"