Anuradha Vipat
सासू-सुनेचे नाते हे अत्यंत नाजूक आणि महत्त्वाचे असते.
सासू-सुनेचे हे नाते अधिक घट्ट आणि आनंदी करण्यासाठी खालील ५ सोप्या टिप्स वापरा.
दोन वेगवेगळ्या पिढ्यांमधील विचारांमध्ये फरक असणे स्वाभाविक आहे. एकमेकांचे विचार न पटल्यास वाद घालण्यापेक्षा शांतपणे ऐकून घ्या.
सासूने आणि सुनेने घरातील महत्त्वाचे निर्णय घेताना एकमेकांचा सल्ला नक्की घ्यावा, ज्यामुळे त्यांना आदर मिळाल्यासारखे वाटेल.
दोघांना आवडणाऱ्या गोष्टी एकत्र करा, जसे की एकत्र स्वयंपाक करणे, एखादी सिरीयल पाहणे किंवा खरेदीला जाणे.
सुरुवातीला एकमेकांकडून खूप जास्त अपेक्षा ठेवू नका.
सासूच्या किंवा सुनेच्या आवडीचा पदार्थ बनवून त्यांना सरप्राइज द्या.