Expensive Coffee : जगातली सर्वात महाग कॉफी बनते मांजरीच्या 'शी' पासून

Mahesh Gaikwad

कॉफी शौकीन

कॉफी प्यायला सर्वांनाच आवडते. जगभरात कॉफीचे शौकीन आपल्याला पाहायला मिळतात.

Expensive Coffee | Agrowon

महाग कॉफी

पण जगातील सर्वात महागडी कॉफी कोणती? हे तुम्हाला माहित आहे का? कोपी लुवाक ही जगातील सर्वात महाग कॉफी आहे.

Expensive Coffee | Agrowon

कॉफी उत्पादन

ही कॉफी जितकी महाग आहे, त्यापेक्षाही ही कॉफी तयार करण्याची पध्दत ऐकून तुम्हाला कीळस आल्याशिवाय राहणार नाही.

Expensive Coffee | Agrowon

मांजरीच्या 'शी'

हो. कारण जगातली महागडी कॉपी कोपी लुवाक ही मांजरीच्या 'शी' पासून तयार होते. ही कॉफी बनविण्यासाठी कॉफीच्या बिया वन्य प्रजातीच्या एका मांजरीला खायला देतात.

Expensive Coffee | Agrowon

पाम सिवेट

इंडोनेशियामध्ये आढळणाऱ्या पाम सिवेट नावाची मांजर कॉफीच्या बिया खाते. त्यानंतर मांजरीच्या विष्ठेतून न पचलेले बियांचे दाणे गोळा केले जातात.

Expensive Coffee | Agrowon

कोपी लुवाक

भारतातील कर्नाटक राज्यातील कुर्ग जिल्ह्यातही कोपी लुवाक तयार केली जाते. भारतात २० ते २५ हजार रुपये प्रतिकिलो इतकी किंमत या कॉफीला मिळते.

Expensive Coffee | Agrowon

एका कपची किंमत

तर अमेरिकेमध्ये या कॉफीच्या एका कपची किंमत तब्बल ६ हजार रुपये एवढी आहे. आशियाई देशातील इंडोनेशियामध्ये ही कॉफी मोठ्या प्रमाणात बनवली जाते.

Expensive Coffee | Agrowon

कॉफीला मागणी

याशिवाय सौदी अरेबिया, दुबई, अमेरिका आणि युरोप सारख्या देशातही या कॉफीला चांगली मागणी आहे.

Expensive Coffee | Agrowon
Expensive Coffee