Mahesh Gaikwad
विविधतेत एकता असणाऱ्या भारतात खाद्यपदार्थांमध्येही विविधता पाहायला मिळते. त्यामुळे भारतीय लोका खाद्यपदार्थांचे शौकिन असतात.
भारतात विविध प्रकारच्या पदार्थांचे शौकिन आहेत. तसेच चहा आणि कॉफी लव्हरही आपल्याला पाहायला मिळतात.
दक्षिण भारतातील अशाच फिल्टर कॉफीच्या शौकिनांसाठी आनंदाची बातमी आहे. भारताच्या फिल्टर कॉफीने जगात विशेष मान मिळवला आहे.
भारताच्या फिल्टर कॉफीला जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोत्तम कॉफीचा बहुमान मिळाला आहे.
फूड रिव्ह्यू देणाऱ्या Taste Atlas ने भारतीय फिल्टर कॉफीला जगात दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोत्कृष्ट कॉफीचा मान दिला आहे.
जगभरातील ३८ सर्वोत्तम कॉफीच्या यादीत भारतीय फिल्टर कॉफीला दुसरे स्थान मिळाले आहे.
कर्नाटकसह दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये फिल्टर कॉफी प्रसिध्द आहे. विशेष म्हणजे कॉफी उत्पादनात कर्नाटक हे अव्वल राज्य आहे.