Anuradha Vipat
घरामध्ये सतत आर्थिक अडचण असणे किंवा डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढणे यामागे अनेकदा घरातील वास्तू दोष कारणीभूत असू शकतात.
वास्तू शास्त्रानुसार योग्य बदल केल्यास कर्जाच्या समस्येतून लवकर सुटका होऊ शकते.
घराची उत्तर दिशा ही कुबेर देवाचा वास मानली जाते. त्यामुळे पैशांचे कपाट किंवा तिजोरी नेहमी उत्तर दिशेला उघडेल अशी ठेवावी.
घराचा ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ, मोकळा आणि हलका असावा. तिथे कोणतीही जड वस्तू, भंगार किंवा कचरापेटी ठेवू नका.
दर गुरुवारी आणि शनिवारी घर पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ मिसळावे. तसेच बाथरूममध्ये एका काचेच्या वाटीत खडे मीठ भरून ठेवावे.
वास्तू शास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाच्या अगदी समोर कधीही आरसा नसावा. आरसा नेहमी घराच्या उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावावा.
घरात पाण्याचा प्रवाह किंवा निचरा नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा. दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला पाण्याचा निचरा असू नये.