Morning Headache : रोज सकाळी उठल्यावर डोके दुखत असेल तर दुर्लक्ष करू नका! असू शकतात गंभीर कारणे

Anuradha Vipat

मुख्य कारणे

सकाळी उठल्याबरोबर डोके दुखण्यामागे अपुरी झोप, डिहायड्रेशन, स्लीप ॲप्निया आणि मायग्रेन ही मुख्य कारणे असतात.

Morning Headache | Agrowon

त्रास

रात्रभर झोपेत असताना शरीरात होणारे बदल किंवा झोपेच्या विकारांमुळे सकाळी डोके जड वाटणे किंवा ठणकणे हा त्रास होऊ शकतो.

Morning Headache | Agrowon

स्लीप ॲप्निया

या विकारात झोपेत श्वासोच्छ्वास काही क्षणांसाठी थांबतो किंवा अडथळा येतो. मेंदूला पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने सकाळी कपाळाच्या दोन्ही बाजूला दाब आल्यासारखे दुखते.

Morning Headache | Agrowon

अपुरी किंवा अति झोप

रात्री शांत झोप न होणे , वारंवार जाग येणे किंवा गरजेपेक्षा जास्त वेळ झोपल्यामुळे शरीराचे नैसर्गिक घड्याळ बिघडते आणि डोके दुखू लागते.

Morning Headache | agrowon

शरीरातील पाण्याची कमतरता

रात्रभर ६ ते ८ तास पाणी न प्यायल्यामुळे शरीरात सौम्य डिहायड्रेशन होते. पाण्याच्या कमतरतेमुळे मेंदूच्या नसांवर ताण येतो आणि सकाळी उठल्यावर डोके ठणकते.

Morning Headache | Agrowon

मायग्रेन

पहाटेच्या वेळी शरीरातील वेदना कमी करणारी नैसर्गिक रसायने कमी होतात आणि ॲड्रेनालिनची पातळी वाढते, ज्यामुळे सकाळी मायग्रेनचा झटका येण्याची शक्यता जास्त असते.

Morning Headache | Agrowon

मानसिक ताण आणि चिंता

अतिविचार, नैराश्य किंवा तणावामुळे झोप शांत लागत नाही, परिणामी सकाळी टेन्शन हेडेक जाणवतो.

Morning Headache | Agrowon

Heart Attack Symptoms : हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरात होतात 'हे' बदल

Heart Attack Symptoms | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...