Anuradha Vipat
आंघोळ केल्यानंतर नकळत केल्या जाणाऱ्या काही चुकीच्या सवयींमुळे त्वचा, केस आणि आरोग्याचे मोठे नुकसान होऊ शकते.
अनेकदा लोक स्वच्छतेच्या नावाखाली किंवा घाईघाईत अशा चुका करतात ज्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतात.
आंघोळीनंतर त्वचा मऊ झालेली असते. टॉवेलने ती जोरात घासल्यास त्वचेचे नैसर्गिक तेल निघून जाते .
ओले असताना केसांची मुळे अत्यंत कमकुवत असतात. अशा वेळी कंगवा फिरवल्यास केस मोठ्या प्रमाणात तुटतात आणि गळतात.
आंघोळीनंतर त्वचेची छिद्रे उघडी असतात. लगेच मॉइश्चरायझर लावले नाही, तर हवेतील कोरडेपणामुळे त्वचा लगेच मॉइश्चर गमावते.
आंघोळीनंतर तासनतास ओला टॉवेल केसांना किंवा शरीराला गुंडाळून ठेवतात. यामुळे कोंडा आणि त्वचेवर बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोकावाढतो.
आंघोळीनंतर बाथरूममध्ये बादलीत उरलेले पाणी तसेच ठेवणे किंवा केस तिथेच टाकून देणे अस्वच्छतेचे लक्षण आहे.