Anuradha Vipat
सकाळी उठल्यावर पोट साफ न होणं आणि गॅस ही आजकालची सर्वसाधारण समस्या बनली आहे.
आयुर्वेदात काही नैसर्गिक पेयं आहेत जी या त्रासांवर झटपट आराम देऊ शकतात
सकाळी उठल्यावर फक्त एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने आतड्यांची हालचाल सुधारण्यास मदत होते
चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्यायल्यास बद्धकोष्ठतेपासून आराम मिळू शकतो.
जिरे पाण्यात उकळून ते पाणी गाळून प्यायल्याने गॅस आणि अपचन कमी होते.
आल्याचं कोमट पाणी प्यायल्यास पचनास मदत होते आणि मळमळ कमी होऊ शकते.
समतोल आहार आणि नियमित व्यायाम देखील पोटाच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत.